
India vs Pakistan: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावरून बराच वाद होत असतानाच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने (ICC) मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या आयोजनावरून भारत आणि पाकिस्तान यांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये बराच वाद होत होते. यावरून बैठकाही झाल्या.
खरंतर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे प्रमुख आयोजक पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आहे. पण भारताने पाकिस्तानला जाण्यासाठी नकार दिला होता. अशात हायब्रिड मॉडेलचा पर्याय होता. परंतु, पाकिस्तान यासाठी फारसे उत्सुक नव्हते.