
Wankhede Stadium makes World Record : नुकताच मुंबईतील वानखेडे स्टेडियमचा ५० वा सुवर्ण मोहोत्सव पार पडला. १९ जानेवरी रोजी वानखेडे स्टेडियमला ५० वर्ष पुर्ण झाली. त्यानिमित्ताने वानखेडेवर मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. या सोहळ्याला मुंबईकडून खेळलेले व भारतीय संघाचे नेतृत्व केलेले सर्व आजी-माजी कर्णधारांनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, सचिन तेंडूलकर, सुनिल गावस्कर, दिलीप वेंगसनकर, रवी शास्त्री, डायना एडुल्जी, अजिंक्य रहाणे यांचा समावेश होता. त्यानंतर वानखेडे स्टेडियमने आज २३ जानेवारी रोजी विश्वविक्रम नोंदवला आहे.