Wasim Jaffer Michael VaughanSakal
Cricket
ENG vs IND: 'वॉन आणि माझ्यात ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याच्या बातम्या निराधार...' कसोटी मालिकेनंतर वासिम जाफरची पोस्ट चर्चेत
Wasim Jaffer’s Trump Tweet on Vaughan Goes Viral: वासिम जाफर आणि मायकल वॉन यांच्यात सोशल मीडियावर नेहमीच थट्टामस्करी पाहायला मिळते. अशातच आता त्यांच्यात ट्रम्प यांनी त्यांच्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या बातम्या निराधार असल्याची पोस्ट जाफरने केली.
Summary
वासिम जाफर आणि मायकल वॉन यांच्यात सोशल मीडियावर मजेशीर 'ट्विटर वॉर' चालू असते.
इंग्लंड-भारत कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटल्यावरही दोघांमध्ये टोमण्यांची मालिका सुरूच होती.
जाफरने ट्रम्पच्या मध्यस्थीबद्दलच्या 'बातम्या' निराधार असल्याचं मजेशीर ट्वीटद्वारे सांगितलं.

