Ravi Shastri Mimicry: अजिंक्य रहाणेचा अभिनय पाहिलात का? दीर्घ श्वास अन् रवी शास्त्रींची हुबेहूब नक्कल; कैफ, जडेजा यांना हसू आवरेना I VIDEO

Ajinkya Rahane mimics Ravi Shastri on live TV: अजिंक्य रहाणेने क्रिकेटच्या मैदानानंतर आता लाइव्ह टेलिव्हिजनवरही आपल्या भन्नाट अंदाजाने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. रहाणेने माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची चक्क हुबेहूब नक्कल केली.
Ajinkya Rahane mimics Ravi Shastri on live TV

Ajinkya Rahane mimics Ravi Shastri in viral cricket video

Sakal

Updated on

Ajinkya Rahane hilarious Ravi Shastri mimicry on Extraaa Innings: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या अजिंक्य रहाणेने समालोचक म्हणून पदार्पण केले आहे. भारत-श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्यात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कसाठी तो समालोचन करतोय. शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्यचा एक वेगळंच रूप यावेळी पाहायला मिळालं. Extraaa Innings कार्यक्रमात अजिंक्यने भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची चक्क हुबेहूब नक्कल केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com