Pakistan U-19 batter Ali Raza moments before his bizarre run-out against England U-19.
esakal
Strangest Run-Outs in Pakistan U-19 Cricket History : पाकिस्तान क्रिकेट संघाला १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडच्या २१० धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १७३ धावांवर गडगडला. ४७व्या षटकात अली रझा याच्या विकेटने पाकिस्तानच्या डावाचा शेवट झाला. अली रझाची हिच विकेट चर्चेचा विषय ठरली आहे. काही क्षणासाठी त्याचं डोकं चालेनासं झालं होतं आणि इंग्लंडचा यष्टिरक्षक व कर्णधार थॉमस रेव यांनी संधी हेरली. रझाचं डोकं ठिकाणावर येण्याच्या आधी त्याने रन आऊट केला. तो video viral झाला आहे.