Axar Patel's Banter With Arshdeep Singh Goes Viral Amid IPL Trade Talks
esakal
IPL 2027 Hardik Pandya Arshdeep Singh trade update : इंडियन प्रीमिअर लीग २०२७ पूर्वी बऱ्याच मोठ्या घडामोडी घडताना दिसणार आहेत. हार्दिक पांड्याच्या ट्रेडकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मोठी डिल झाली. आता मुंबई इंडियन्स व पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यातल्या ट्रेडकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय खेळाडूंमध्येही याबाबत चर्चा सुरू आहे आणि एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.