Kieron Pollard Naseem Shah heated moment video
esakal
ILT20 final Kieron Pollard vs Naseem Shah argument: इंटरनॅशनल लीग टी-२० स्पर्धेच्या फायनलमध्ये वातावरण तापलेले पाहायला मिळाले. MI Emirates चे प्रतिनिधित्व करणाऱ्या किरॉन पोलार्डने पाकिस्तानी गोलंदाजाला त्याची जागा दाखवली. डेझर्ट व्हायपर्स संघाकडून खेळणाऱ्या नसीम शाहने मुद्दाम वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू खेळाडूला डिवचले आणि त्यानंतर पोलार्डचा पारा चढला. एमआय इमिरेट्सच्या फलंदाजीतील ११ व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर हा प्रसंग घडला. सध्या या दोघांमधील वादाचा व्हिडीओ सोशल मीडिया गाजवतोय..