Did Gambhir avoid praising Pant in press conference? भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला पहिल्या कसोटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रिषभ पंतचे कौतुक झालेले आवडले दिसत नाही. इंग्लंडने हेडिंग्ले कसोटीत भारतावर पाच विकेट्स राखून विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने विजयासाठी ठेवलेले ३७१ धावांचे लक्ष्य इंग्लंडने सहज पार केले. पण, या सामन्यात भारताच्या चार फलंदाजांनी शतक झळकावली. रिषभने दोन शतकं झळकावून इतिहास रचला.