Virat Kohli being escorted by security after fans surrounded him at Vadodara Airport
esakal
Virat Kohli arrival at Vadodar aahead of IND vs NZ ODI : भारताचा सुपरस्टार विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यासाठी वडोदरा येथे दाखल झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर विराट व रोहित शर्मा दोघंही विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळले होते. तेव्हा विराटचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी नव्हती. पण, आता वन डे मालिकेत विराटचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे.
११ जानेवारीला India vs New Zealand पहिला सामना होणार आहे आणि त्यासाठी विराट वडोदरा येथे आला. पण, विमानतळाबाहेर त्याला पाहण्यासाठी, फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी तौबा गर्दी केली होती. सुरक्षारक्षकांनी चाहत्यांच्या गराड्यातून विराटला सुखरूप त्याच्या गाडीपर्यंत पोहोचवले. पण, व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे नेटिझन्स संतापले. ही लोकं अशी वागतात म्हणून विराट भारतात राहत नाही, अशी एकाने कमेंट केली.