

Daniel Vettori explains why Sunrisers signed Abrar Ahmed
esakal
Abrar Ahmed signing controversy explained by SRH coach : पाकिस्तानी गोलंदाज अबरार अहमद याला दी हंड्रेड लीगमध्ये करारबद्ध करणे आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादला महागात पडले आहे. दी हंड्रेड लीगमध्ये सनरायझर्सचा मालकी हक्क असलेल्या सनरायझर्स लीड्स संघाने पाकड्या फिरकीपटूला २.३० कोटी रूपयांत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. याच अबरारने ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताचा अपमान केला होता आणि त्याने कॅप्टन अभिनंदन यांचीही खिल्ली उडवली होती. त्यामुळे तो आधीच भारतीयांच्या डोक्यात गेला होता आणि त्यात काव्या मारनच्या संघाने त्याला करारबद्ध केल्याने बराच वाद सुरू झाला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांनाही हा निर्णय आवडलेला नाही आणि त्यांनी काव्या मारन आणि SRH वर बंदीची मागणी केली आहे.