

India Pakistan Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीबाबतचा गुंता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) कोणत्याही परिस्थिती टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून ( PCB) रोज पोकळ धमक्या दिल्या जाताना वाचायला मिळत आहेत. PCB चे अध्यक्ष मोहसिन नक्वी ( Mohsin Naqvi) यांनी पुन्हा एकदा BCCI ला धमकी दिली आहे.