WI vs PAK Test: वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध कसोटी खेळण्यास दिला नकार! प्रशिक्षक डॅरेन सॅमीने सर्व काही खरं सांगितलं

West Indies Name Squad For Pakistan Tests: पाकिस्तानविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाजाने पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवड होण्यास नकार दिला आहे.
West Indies player refused to play against Pakistan

Daren Sammy speaks about Alzarri Joseph's decision to opt out of the Pakistan Test series.

esakal

Updated on

West Indies vs Pakistan Test series latest news: वेस्ट इंडिज संघाने २५ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली. विंडीजने या संघाने डावखुरा फिरकीपटू जोशुआ बिशॉप याला पदार्पणाची संधी दिली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेला दुखापतीमुळे मुकलेला रोस्टन चेस कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी परतला आहे. जोमेल वॉरिकन हा उप कर्णधारपदी कायम आहे. विंडीजने या महिन्याच्या सुरूवातीला श्रीलंकेविरुद्धची मालिका १-० अशी जिंकली होती. पण, या संघ निवडीच्या घोषणेपेक्षा एका स्टार खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास दिलेला नकार चर्चेत आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com