West Indies vs Zimbabwe: झिम्बाब्वे संघाचा वानखेडे स्टेडियमवर कस लागणार? विंडीजला खेळपट्टी अन् वातावरणाचा फायदा होण्याची शक्यता
Super-8, Wankhede Stadium: मुंबई वानखेडे स्टेडियमवर आज सुपर-८ फेरीत दोन वेळा विजेता वेस्ट इंडीज आणि जोरदार कामगिरी करणारा झिम्बाब्वे यांच्यात सामना रंगणार आहे.
मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज दोन वेळचा विजेता वेस्ट इंडीज व यंदाच्या स्पर्धेत भुवया उंचावणारी कामगिरी करणारा झिम्बाब्वे यांच्यामध्ये सुपर-८ फेरीची लढत रंगणार आहे.