रोहित शर्मा, विराट कोहली यांनी खेळणं सोडलं तर काय होईल? R Ashwin च्या धक्कादायक दाव्याने क्रिकेटविश्वात खळबळ

R Ashwin comments on future of ODI cricket: रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय वनडे क्रिकेटचे दोन मजबूत आधारस्तंभ. मात्र, हे दोघं खेळणं थांबवल्यानंतर वन डे क्रिकेटचं भवितव्य काय असेल, असा थेट आणि धक्कादायक प्रश्न माजी भारतीय फिरकीपटू आर. अश्विनने उपस्थित केला आहे. त्याच्या या विधानामुळे क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
What Happens to ODIs After Rohit Sharma and Virat Kohli? R Ashwin Sparks Debate

Rohit Sharma | Virat Kohli

esakal

Updated on

What will happen to ODI cricket after Rohit virat retirement? पुढील वर्षी म्हणजेच २०२७ मध्ये वन डे वर्ल्ड कप स्पर्धा झाली आणि महान फलंदाज विराट कोहली व रोहित शर्मा निवृत्त झाले तर वन डे क्रिकेटच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहील, असे मत माजी फिरकी गोलंदाज आर. अश्विनने ( R Ashwin) व्यक्त केले आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळत असल्यामुळे विजय हजारे राष्ट्रीय वन डे क्रिकेट स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे; परंतु वाढत्या ट्वेंटी-२० लीग आणि कसोटी सामन्याचे महत्त्व अधोरेखित असताना ५०-५० षटकांचा हा प्रकार लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर गटांगळ्या खात आहे, असे अश्विनचे म्हणणे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com