
बीसीसीआयने क्रिकेटपटूंसाठी रग्बी शैलीतील ‘ब्रॉन्को टेस्ट’ सुरू केली आहे.
स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच एड्रियन ले रॉक्स यांच्या सूचनेनंतर हा निर्णय घेतला गेला.
Yo-Yo टेस्ट आणि २ किलोमीटर टाइम ट्रायलसह आता ब्रॉन्को टेस्टही फिटनेस मापदंड ठरणार आहे.
Explained: Difference between Yo-Yo Test and Bronco Test in cricket : भारतीय क्रिकेटपटूंचा फिटनेस आणखी चांगला व्हावा यासाठी बीसीसीआयने रग्बी खेळाडूंसाठी वापरण्यात येणारी ‘ब्रॉन्को टेस्ट’ क्रिकेटपटूंसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या चाचणीत २० मीटर, ४० मीटर आणि ६०मीटर धावणे असे टास्क असणार आहेत. भारतीय क्रिकेटपटूंनी उच्च पातळीची तंदुरुस्ती राखावी आणि त्यांची एरोबिक क्षमता सुधारावी यासाठी यासाठी ही चाचणी सुरू करण्यात आली आहे.