Where To Watch IND vs NZ 2nd Test Live? Free Streaming Options
esakal
INDIA VS NEW ZEALAND 2ND TEST FREE MADHE KUTHE PAHATA YEIL? दक्षिण आफ्रिका विजयामागून विजय मिळवत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत जवळपास पोहोचला आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघावर दडपण वाढत चालले आहे आणि हा भार घेऊन शुभमन गिलचा संघ शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा सामना करायला उतरणार आहे.
पहिला सामन्या विजय डोळ्यासमोर दिसत असताना भारताला अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाचव्या दिवशी चिवट खेळ करून मॅच ड्रॉ राखली. त्यामुळे WTC Table मध्ये भारताला फटका बसला आणि आता अंतिम फेरी गाठायची असल्यास क्राईस्टचर्चमधील हॅगली येथे होणारा हा सामना जिंकावा लागणार आहे. पण, हा सामना किती वाजता सुरू होणार? कुठे पाहता येणार? भारतात मॅच फ्रीमध्ये लाईव्ह कुठे दिसणार?