
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्या त्याच्या मैदानातील कामगिरीमुळे चर्चेत आला होता. भारत आणि इंग्लंड संघात सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सला झाला होता. या सामन्यात चौथ्या डावात १९३ धावांचा पाठलाग भारतीय संघ करत असताना शानदान नाबाद अर्धशतकी खेळी करत विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता.