Virat Kohli, Rohit Sharma next match for Team India
esakal
Virat Kohli, Rohit Sharma next match for Team India: विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या कडव्या संघर्षानंतरही भारताला तिसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. २७ धावांनी विजय मिळवून इंग्लंडने वन डे मालिका २-१ अशी जिंकली. ३८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने ६० चेंडूंत ७४ धावांची खेळी केली, तर रोहितने ११० चेंडूंत १३८ धावा चोपल्या. रोहितने १२५.४५च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ५ षटकार व १७ चौकार लगावले. रोहित व विराट यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली आणि यात रोहितनच्या ४८ चेंडूंत ७१ धावा होत्या. रोहितने या खेळीसह त्याच्या निवृत्तीच्या चर्चाही टोलवून लावल्या.