Where to watch India vs Afghanistan T20I series 2026
esakal
India vs Afghanistan T20I TV channel and live streaming: भारतीय संघ बऱ्याच दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा ट्वेंटी-२० मालिका खेळण्यासाठी सज्ज होत आहे. BCCI ने अफगाणिस्तनविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी मंगळवारी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर ही मालिका खेळवण्यात येणार असली तरी यजमानपद अफगाणिस्तान भूषवणार आहे. त्यामुळे घरच्याच मैदानावर पाहुणा म्हणून भारतीय संघाला खेळावे लागणार आहे. मालिकेसाठी दोन्ही संघांचे खेळाडू ठरले आहेत, तारखाही ठरल्या आहेत आणि आता या लढती LIVE कुठे पाहता येतील याची उत्सुकता आहे.