Auqib Nabi, the fast bowler from Jammu & Kashmir, grabbed 55 wickets in the Ranji Trophy
esakal
Auqib Nabi 55 wickets Ranji Trophy season : रणजी करंडक स्पर्धेच्या २०२५-२६ च्या पर्वात एक नाव सध्या जास्त चर्चेत आले आहे... ते म्हणजे औकिब नबी... जम्मू काश्मीर संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करताना इतिहास घडवला. जम्मू काश्मीरच्या या ऐतिहासिक कामगिरीत वेगवान गोलंदाज औकिब नबी याचा सिंहाचा वाटा आहे आणि अंतिम सामन्यात त्याने कर्नाटकच्या नाकी नऊ आणले आहेत. लोकेश राहुल, करुण नायर या भारतीय संघातील स्टार फलंदाजांना अकिबने रणजी फायनलमध्ये घरचा रस्ता दाखवला... KL Rahul तर त्याच्या गोलंदाजीसमोर चाचपडलाच होता. औकिब नबीची ही कामगिरी सर्वांना अचंबित करणारी आणि कौतुकास पात्र ठरतेय.