Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

Who is Jamie Smith England wicketkeeper batter? इंग्लंडच्या या २४ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाजाने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत १५० धावांची ऐतिहासिक खेळी करत टीम इंडियाची झोप उडवली आहे. त्याने अवघ्या ८० चेंडूंमध्ये शतक झळकावून सर्वांना थक्क केलं, आणि त्यानंतर आपल्या खेळीचं रूपांतर मोठ्या डावात केलं.
Jamie Smith
Jamie Smithesakal
Updated on

Jamie Smith biography, age, stats, county career, debut Test इंग्लंडला ५ बाद ८४ धावांवरून तीनशेपार नेणाऱ्या जेमी स्मथिची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. दुसऱ्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावातील ५८७ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला ८४ धावांवर पाच धक्के बसले होते. तेव्हा २४ वर्षीय जेमी स्मिथ मैदानावर आला. मोहम्मद सिराज हॅटट्रिकवर होता आणि स्मिथने अगदी चतुराईने तो चेंडू खेळून काढला. हॅरी ब्रूक आणि स्मिथ या जोडीने टीम इंडियाच्या नाकी नऊ आणले आहेत. या दोघांनी दोनशेहून अधिक धावांची भागीदारी करताना अनेक विक्रमांची नोंद केलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com