India-born Jerrssis Wadia took two wickets in his first two balls for Adelaide Strikers in BBL
esakal
Jerrssis Wadia takes two wickets in first two balls BBL : मेलबर्न रेनेगेड्स विरुद्ध ए़डिलेड स्ट्रायकर्स यांच्यातल्या बिग बॅश लीगमधील सामन्यात दमदार कामगिरी पाहायला मिळाली. भारतीय वंशाच्या जेर्सिस वाडियाने सामन्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर रेनेगेड्सच्या दोन फलंदाजांना भोपळ्यावर बाद केले. वाडियाने पहिल्या चेंडूवर टीम सेईफर्टला गोल्डन डकवर यष्टिरक्षक अॅलेक्स केरीकरवी झेलबाद केले. त्यानंतर जॅक फ्रेझर मॅकगर्कलाही गोल्डन डकवर रिटर्न कॅच घेत कॉट अँड बोल्ड करून माघारी पाठवले. रेनेगेड्सने दोन चेंडूंत दोन विकेट्स गमावल्या.