Who is Mahli Beardman? पदार्पणाच्या पाच षटकांत ५ विकेट्स! इंग्लंडची ८ बाद ६५ अशी दयनीय अवस्था, ऑस्ट्रेलियाच्या २१ वर्षीय गोलंदाजाचा कहर... Video

Who is Mahli Beardman Australian fast bowler? ऑस्ट्रेलियाला महली बियर्डमनच्या रूपाने वेगवान गोलंदाजीतील नवा हिरा सापडला आहे. इंग्लंडविरुद्ध पर्थ येथे सुरू असलेल्या पहिल्या वन डे सामन्यात २१ वर्षीय बियर्डमनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवला.
Australia vs England 1st ODI

Australian debutant Mahli Beardman celebrates after taking five wickets against England in the first ODI at Perth

esakal

Updated on: 

Mahli Beardman Equals 38-Year-Old Record : भारताविरुद्ध चौथ्या वन डेत न्यूझीलंडने ३३३ धावांचा डोंगर उभा केलेला असताना दुसरीकडे पर्थवर इंग्लंडने २१ वर्षीय गोलंदाज महली बियर्डमनसमोर शरणागती पत्करलेली पाहायला मिळाली. या मध्यमगती गोलंदाजाने पदार्पणाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी आपल्या पहिल्या सहा षटकांत त्याने १८ धावांत पाच विकेट्स घेतल्या. वन डेत पदार्पण करण्यापूर्वी ११ लिस्ट ए सामन्यांमध्ये २१ फलंदाजांना बाद करणारा बियर्डमन, वन डे पदार्पणात पाच बळी घेणारा केवळ दुसरा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडने १९ षटकांत ६५ धावांत ८ फलंदाज गमावले.

Loading content, please wait...