Virat Kohli meets his childhood look-alike Garvit Uttam during the IND vs NZ ODI in Vadodara
esakal
Virat Kohli meets his childhood look alike fan: भारतीय संघाने वडोदरा येथील वन डे सामन्यात चार विकेट्स राखून विजय मिळवून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात विराट कोहलीचे शतक सात धावांनी हुकले, परंतु त्याचे सातत्य टीम इंडियासाठी पुन्हा एकदा महत्त्वाचे ठरले. पण, विराटच्या या खेळीपेक्षा दुसऱ्याच गोष्टीची चर्चा अधिक रंगली.
या सामन्यापूर्वी सराव सत्र आटपून विराट जेव्हा टीम बसमध्ये जात होता, तेव्हा एका चिमुकल्यासोबत त्याने फोटो काढला. तो फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे आणि तो चिमुकला सेम टू सेम विराट जसा लहानपणी दिसायचा तसाच दिसला. त्यामुळे नेटिझन्सनी त्याला 'Mini Kohli' असे नाव दिले. पण, हा मुलगा नेमका आहे कोण आणि त्याचे नाव काय?