Parth Bhut all round performance vs Punjab quarterfinal
esakal
Shubman Gill Ranji Trophy comeback failure vs Saurashtra: रणजी करंडक स्पर्धेत सौराष्ट्र विरुद्धच्या दोन्ही डावात पंजाबचा शुभमन गिल अपयशी ठरला. पहिल्या डावात भारतीय कर्णधार आपले खातेही उघडू शकला नाही, तर दुसऱ्या डावात त्याने फक्त १४ धावा केल्या. दोन्ही डावात पार्थ भूतने ( Who is Parth Bhut) त्याला बाद केले आणि तेही पायचीतच... शुभमन गिलच्या या अपयशानंतर तो फक्त सपाट खेळपट्ट्यांवर धावा काढू शकतो, त्याला कठीण विकेटवर टिकून राहण्यास त्रास होतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचवेळी शुभमनला सलग दोनदा बाद करणारा पार्थ भूत कोण आहे, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.