
IPL 2025 Auction: इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेसाठी मेगा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर दरम्यान सौदी अरेबियातील जेद्दाह येथे पार पडला. या लिलावात अनेक युवा खेळाडूंना फ्रँचायझींनी आपल्या संघात घेतलं. दरम्यान, या लिलावात महाराष्ट्र संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या पाच खेळाडूंना खरेदी करण्यात आले आहे.
यामध्ये राहुल त्रिपाठी, मुकेश चौधरी, रामकृष्ण घोष, राजवर्धन हंगारगेकर आणि अर्शिन कुलकर्णी यांचा समावेश आहे. राहुल, राजवर्धन, मुकेश यांना आयपीएल खेळण्याचा अनुभव आहे. तसेच अर्शिनने १९ वर्षांखालील भारतीय संघाकडून आपली प्रतिभा दाखवलेली आहे. मात्र या सर्वांमध्ये रामकृष्ण घोष हे नाव अनेक क्रिकेटप्रेमींसाठी नवं आहे.