Former cricketer questions Shubman Gill’s authority as Indian captain
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याच्या नेतृत्वावर टीका होताना दिसत आहे. इंग्लंडने लीड्स कसोटीत ३७१ धावांचे लक्ष्य पाच विकेट्स राखून सहज पार केले आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृ्त्व आले आणि त्याच्या नेतृत्वाखालील पहिल्याच सामन्यात भारताची हार झाली. या सामन्यात नेमकं काय करावं, कोणते डावपेच आखावे हेच शुभमनला कळत नव्हते.