Wasim Jaffer applies for India chief selector post
Wasim Jaffer applies for India chief selector post: ४ ऑक्टोबर २०२६, मध्ये अजित आगरकरचा निवड समिती प्रमुख म्हणून कार्यकाळ संपला आणि त्यानंतर प्रग्यान ओझा, अंतरिम अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी पार पाडतोय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) या पदासाठी अर्ज मागवले आहेत आणि सुरुवातीला पार्थिव पटेल याचे नाव आघाडीवर होते. पण, पार्थिवने अर्ज न भरण्याचा निर्णय घेतल्याने, आता मुंबईचा माजी स्टार खेळाडू आणि भारताचा माजी सलामीवीर वासीम जाफर या शर्यतीत उतरला आहे. मुख्य प्रशिक्षकपदासाठी लागणाऱ्या सर्व अटींमध्ये जाफर सरस ठरतोय आणि म्हणून त्याची निवड निश्चित मानली जात आहे.