

IND W vs ZIM W
esakal
SMRITI MANDHANA BLACK ARM BAND: भारत आणि झिम्बाब्वेच्या महिला संघांमध्ये आज, १६ ऑक्टोबर रोजी टी-२० मालिकेला सुरुवात झाली आहे. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. या मालिकेत तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत.
भारतीय संघाची धुरा पहिल्यांदाच पूर्णवेळ कर्णधार म्हणून स्मृती मंधानाकडे सोपवण्यात आली आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.