
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सध्या सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ( WTC) सायकलच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे कठोर पावले उचलली आहेत. तिसऱ्या WTC फायनलसाठी मजबूत दावेदार असलेल्या भारतीय संघाने आपल्या शेवटच्या १० कसोटी सामन्यांपैकी ६ गमावले, यात न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावराली ०-३ असा ऐतिहासिक पराभव आणि ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमवण्याचा समावेश आहे. यामुळे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरची अवघ्या आठ महिन्यांत हकालपट्टी करण्यात आली आहे, तसेच क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप आणि स्ट्रेंथ व कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई यांनाही काढून टाकण्यात आले आहे.