Yashasvi Jaiswal practises wicketkeeping in Ranji Trophy
esakal
Why is Yashasvi Jaiswal practising wicketkeeping for Mumbai: संघर्षातून स्वतःची ओळख निर्माण करत भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या यशस्वी जैस्वालने एक अनपेक्षित पाऊल उचललं आहे. रणजी करंडक स्पर्धेत मुंबई विरुद्ध चंडीगड सामन्यात यशस्वी ब्रेकमध्ये यष्टिरक्षणाचा सराव करताना दिसला. या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबईचा कर्णधार सिद्धेश लाडने याचे संकेत दिले होते. यशस्वी भविष्यात मुंबईकडून यष्टिरक्षण करताना दिसेल किंवा तो भारतीय संघातही यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळताना दिसू शकतो, असे सिद्धेशने म्हटले होते. त्याच्या या विधानाने सर्वांच्या भूवया उंचावल्या.. पण, यशस्वी यष्टिरक्षण का करावेसे वाटतंय?