India ODI squad against New Zealand is delayed
esakal
India vs New Zealand ODI squad latest update : भारतीय संघ या महिन्याच्या अखेरीस न्यूझीलंड दौऱ्यावर पाच ट्वेंटी-२०, पाच वन डे आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जाणार आहे. BCCI ने मंगळवारी ट्वेंटी-२० मालिकेसाठीचा संघ जाहीर केला. जवळपास चार वर्षानंतर भुवनेश्वर कुमारचे भारतीय संघात पुनरागमन झाले. अजित आगरकरचा कार्यकाळ संपल्यानंतर झालेली ही पहिलीच संघ निवड आहे आणि प्रभारी अध्यक्ष म्हणून प्रग्यान ओझाने भूमिका पार पाडली. ट्वेंटी-२० संघ जाहीर केल्यानंतर वन डे मालिकेसाठी खेळाडूंची घोषणा कधी होईल, हा प्रश्न सध्या चाहत्यांना पडला आहे. पण, संघ व्यवस्थापनाच्या डोक्यात काही वेगळी योजना शिजताना दिसतेय.