

Kapil Dev interview latest Sachin comment meaning
esakal
Kapil Dev interview latest Sachin comment meaning: भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांनी सचिन तेंडुलकरबद्दल केलेले विधान चर्चेत आले आहे. त्यांच्या मते सचिनचे १५ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण करणे, हे युवकांसाठी डोकेदुखी ठरणारे ठरले. सचिनचे उदाहरण देऊन अनेक पालक त्यांच्या मुलांना, सचिनसारखे बनण्यास दडपण टाकत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी मास्टर ब्लास्टरचे खूप कौतुक केले आहे. ते म्हणाले की, सचिनने वयाच्या १५ व्या वर्षी भारतासाठी पदार्पण केले आणि तेव्हापासून अनेकांना वाटते की त्यांच्या मुलांनीही तसेच करावे.