
Karun Nair Ignored by BCCI for CT25: कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी शनिवारी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठीचा संघ जाहीर केला. १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. भारतासमोर यजमान पाकिस्तानसह बांगलादेश व न्यूझीलंड यांचे आव्हान असणार आहे आणि टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. आजची संघाची घोषणा होण्यापूर्वी बीसीसीआयने १० कडक नियम बनवले होते आणि त्यातला प्रमुख नियम म्हणजे देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य. राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळायलाच हवे. या स्पर्धेचा विचार राष्ट्रीय संघ निवडीसाठी केला जाणार, असेही म्हटले गेले होते. पण, आजच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील संघाकडे पाहता BCCI या शब्दाला जागल्याचे दिसले नाही.