

Why Vaibhav Sooryavanshi did not make India debut
esakal
Why Vaibhav Sooryavanshi did not make India debut: भारत आणि आयर्लंड(INDvsIRE) यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत सर्वाधिक चर्चा झाली ती १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या(Vaibhav Sooryavanshi) संभाव्य पदार्पणाची. मात्र, संपूर्ण मालिका संपली तरी त्याला भारतीय संघाकडून पदार्पणाची संधी मिळाली नाही.
पहिल्या सामन्यात भारताला ३४ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर दुसऱ्या सामन्यात तरी वैभवला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, संघ व्यवस्थापनाने दुसऱ्या सामन्यातही त्याला अंतिम अकरामध्ये स्थान न देता बाकावरच ठेवले. आता या निर्णयामागचे कारण भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी स्पष्ट केले आहे.