Why was Suryakumar Yadav excluded from Mumbai Ranji team
esakal
Why was Suryakumar Yadav excluded from Mumbai Ranji team? भारताचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव याचे परतीचे दरवाजे बंद होताना दिसतेय. २०२४ चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्याकडून ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद काढून घेतले गेले आणि २०२६ चा वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून श्रेयस अय्यरकडे ही जबाबदारी सोपवली गेली. तरीही सूर्याने भारतीय संघात पुनरागमन करण्याचे ध्येय ठेवले होते, परंतु त्याच्या या स्वप्नांचा मंगळवारी चुराडा झाला. मुंबई क्रिकेट असोसिएशनने ( MCA) रणजी करंडक स्पर्धेचा संघ जाहीर केला आणि त्यात सूर्यकुमारला स्थान न दिल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.