

Chattrapati Sambhaji Maharaj Chhaava Movies: छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन आणि त्यागाचे वर्णन करणारा विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट संपूर्ण भारतातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'Chhaava' या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल, येसूबाई भोंसलेच्या भूमिकेत रश्मिका मंदाना , औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्ना हे दिसत आहेत. सिनेमा समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही चित्रपटाच्या भव्यतेचे कौतुक केले आहे. हा चित्रपट पाहून भारताच्या माजी फलंदाजाने महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.