Pat Cummins miracle catch while bowling WI vs AUS 2nd Test : भारत-इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅम येथे दुसरी कसोटी सुरू असताना वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेला ऑस्ट्रेलियाचा संघ मैदान गाजवतोय. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करून बाजी मारली आणि आता दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजकडून चांगला खेळ झालेला दिसतोय. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने घेतलेल्या एका अफलातून झेलची हवा आहे.