Justin Greaves five consecutive wicket maidens record
esakal
Justin Greaves creates Test cricket history in WI vs PAK 1st Test: वेस्ट इंडिजसमोर पाकिस्तानने गुडघे टेकल्याचे दिसतेय... पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील ३११ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने ४ बाद २४४ धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर जस्टीन ग्रेव्हीसच्या भेदक माऱ्यासमोर पाकड्यांनी शस्त्र टाकले. ग्रेव्हीसने सलग पाच षटकं निर्धाव टाकताना पाच विकेट्स घेतल्या आणि पाकिस्तानने ३८ धावांत ७ फलंदाज गमावले. त्यामुळे पहिल्या डावात त्यांना २८२ धावाच करता आल्या. ग्रेव्हीसने सलग पाच षटकं निर्धाव टाकून कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास घडवला. असा पराक्रम करणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला.