वेस्ट इंडिजने पाकिस्तानला २०२ धावांनी हरवत ३४ वर्षांनंतर वन डे मालिका जिंकली.
कर्णधार शे होप आणि जेडन सील्स यांच्या शानदार कामगिरीने विजयाची पायाभरणी केली.
जेडन सील्सने ७.२ षटकांत १८ धावांत ६ विकेट्स घेत विक्रम रचला.
WI vs PAK 2025 ODI series final match highlights and stats पाकिस्तान क्रिकेट संघाला बुधवारी लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. वेस्ट इंडिजने घरच्या मैदानावरील तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या व निर्णायक लढतीत २०२ धावांनी विजय मिळवून मालिका २-१ अशी जिंकली. ३४ वर्षानंतर विंडीजने प्रथमच पाकिस्तानविरुद्ध वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. कर्णधार शे होप व गोलंदाज जेडन सील्स या विजयाचे शिल्पकार ठरले.