Amir Jangoo and Roston Chase 401-run partnership
esakal
WI vs SL 1st Test world record partnership : वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी झालेली पाहायला मिळाली. वेस्ट इंडिजचा आमिर जांगू आणि कर्णधार रोस्टन चेस यांनी मिळून कसोटी क्रिकेटच्या १४९ वर्षांच्या इतिहासात अभूतपूर्व विक्रम रचला आहे. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ४०१ धावांची विक्रमी भागीदारी केली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सहाव्या विकेटसाठी ४०० किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी करणारी जगातील ही पहिली जोडी ठरली आहे.