
BCCI’s update on Rishabh Pant’s fitness ahead of Champions Trophy 2025: भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा २०१३ नंतरचा दुष्काळ संपवण्यासाठी तयारी करतोय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिजाने जसा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा १७ वर्षांचा दुष्काळ संपवला, त्याचीच पुनरावृत्ती चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वांना अपेक्षित आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत रोहितने शतक झळकावून वेळेत फॉर्म मिळवला आहे, तर विराट कोहलीनेही शेवटच्या लढतीत अर्धशतक झळकावले होते. पण, पहिल्याच सराव सत्रात रिषभ पंतच्या दुखापतीने टीम इंडियाचं टेंशन वाढवलं आहे.