विराट कोहली व रोहित शर्मा ट्वेंटी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांची वन डे कारकीर्द चर्चेत आली आहे.
बांगलादेश दौऱ्यातील वन डे मालिका पुढे ढकलल्याने विराट-रोहितला ब्लू जर्सीमध्ये पाहण्याची प्रतीक्षा वाढली आहे.
२०२७ वर्ल्ड कपपूर्वी फारच कमी वन डे सामने त्यांच्या वाट्याला येणार असल्याने त्यांचा सहभाग शंकास्पद आहे.
Team India strategy for next ODI World Cup : ट्वेंटी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणारे विराट कोहली व रोहित शर्मा या दोन स्टार खेळाडूंची वन डे कारकीर्दितील भविष्याची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय संघ या महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर तीन वन डे सामने खेळण्यासाठी जाणार होता. पण, बांगलादेशातील परिस्थिती पाहता ही मालिका २०२६ पर्यंत स्थगित केली गेली आहे. त्यामुळे विराट-रोहित यांना ब्लू जर्सीमध्ये पाहण्याची प्रतीक्षा लांबली आहे. भारतीय संघात सध्या युवा जोश पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच विराट, रोहितच्या भविष्याची चर्चा आता सुरू झाली आहे.