Ravi Shastri’s big statement on Virat Kohli’s future in coaching
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली. मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराट या फॉरमॅटमधून निवृत्त झाला होता. आता तो फक्त वन डे क्रिकेट खेळणार आहे आणि २०२७ चा वर्ल्ड कप त्याला जिंकायचा आहे. पण, त्यानंतर काय? असा प्रश्न सर्वच चाहत्यांना सतावतोय आणि भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी किंग कोहलीच्या फ्युचर प्लानबद्दल मोठं विधान केलं आहे.