

Women’s Asia Cup 2026
esakal
INDIA MAY FACE TROPHY DRAMA AGAIN: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा मैदानात आमनेसामने येतात, तेव्हा सामना फक्त क्रिकेटपुरता मर्यादित राहत नाही. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये मैदानाबाहेरही अनेकदा ड्रामा पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा असंच काहीसं घडण्याची शक्यता दिसत आहे.
भारतीय महिला संघ सध्या हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली आशिया कपमध्ये जबरदस्त प्रदर्शन करत आहे. भारताने ग्रुप स्टेजमधील आपले सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकले आहेत. थायलंड, हाँगकाँग आणि पाकिस्तान या तिन्ही संघांना पराभूत करत भारताने सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे.