How India can qualify for World Cup 2025 semifinals
esakal
How India can qualify for World Cup 2025 semifinals : भारतीय महिला संघाने महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील कालच्या लढतीत इंग्लंडविरुद्धचा हातातला सामना गमावून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. इंग्लंडने ४ धावांनी मॅच जिंकून उपांत्य फेरीतील तिसरी जागा निश्चित केली आणि आता चौथ्या व शेवटच्या जागेसाठी भारतासह पाच संघ शर्यतीत आहेत. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश व न्यूझीलंड हे संघ एका जागेसाठी आता जोर लावणार आहेत. आता कोणाला किती संधी हे जाणून घेऊयात...