
Womens U19 T20 World Cup : महिलांच्या १९ वर्षांखालील ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला उद्यापासून सुरूवात होणार आहे. मलेशिया येथे यावेळी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे. तीन सामन्यांनी वर्ल्ड कपच्या दुसऱ्या आवृत्तीला सुरूवात करण्यात येणार आहे. भारताचा स्पर्धेतील पहिला सामना वेस्ट इंडिजविरूद्ध १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.