
Women's U19 T20 World Cup winner Gongadi Trisha : भारतीय महिला संघाने मलेशियामध्ये आज सलग दुसरा १९ वर्षांखालील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली गोंगडी त्रिशा. त्रिशाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे तीन विकेट्स घेतल्या आणि सामन्यात फायनलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज ठरली. गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीमध्येही तीने आपली चमक दाखवली, नाबाद ४४ धावांची खेळी करत ती या सामन्यात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली.