World Cup : वर्ल्डकपच्या सरावासाठी रोहित-सूर्याची अदलाबदल?

सलग १० सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा यंदा प्रथमच प्रमुख ११ खेळाडूंत नव्हता. त्याला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले.
Rohit Sharma and Surya kumar Yadav
Rohit Sharma and Surya kumar Yadavesakal

मुंबई - सलग १० सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा यंदा प्रथमच प्रमुख ११ खेळाडूंत नव्हता. त्याला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले. त्याच वेळी सूर्यकुमार यादवचा अंतिम ११ खेळाडूंत समावेश करण्यात आला. अशा प्रकारे शुक्रवारी कोलकताविरुद्धच्या सामन्यात दोघांची अदलाबदल करण्यात आली.

सूर्यकुमार यादव दुखापतीनंतर यंदाच्या स्पर्धेत खेळताना इम्पॅक्ट खेळाडू म्हणून खेळलेला आहे. त्यामुळे त्याने क्षेत्ररक्षण केलेले नाही. विश्वकरंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठी सूर्यकुमारची निवड झाली. त्यामुळे त्याला क्षेत्ररक्षणाचा सराव असावा आणि त्याद्वारे पूर्ण तंदुरुस्तीही तपासता यावी यासाठी हा बदल करण्यात आल्याचे समजते.

एकीकडे हा बदल करत असताना मुंबई संघाने चारऐवजी तीनच परदेशी खेळाडू खेळवले. जेराल्ड कोएत्झी, टीम डेव्हिड आणि नुवान तुसारा हे ते तीन परदेशी खेळाडू संघात होते. कोलकता संघानेही सुनील नारायण, आंद्रे रसेल आणि फिल साल्ट अशा तीनच परदेशी खेळाडूंना संधी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com