ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने त्वचेच्या कर्करोगाबाबत अपडेट दिली आहे. त्याला नाकावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. क्लार्कने त्वचेच्या नियमित तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले आहे..क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार मायकल क्लार्क याने त्याला झालेल्या कर्करोगाबाबत माहिती दिली आहे. क्लार्कने यापूर्वीच सांगितले होते की त्याला त्वचेचा कर्करोग झाला आहे. आता त्याबाबत त्याने अपडेट दिली आहे..Ravichandran Ashwin IPL Retirement : रविचंद्रन अश्विनचा IPL ला देखील रामराम! 8 महिन्यात घेतला दुसरा मोठा निर्णय.४४ वर्षीय क्लार्कने माहिती दिली की या आजारामुळे त्याच्या नाकाचा छोटा भाग काढून टाकावा लागला. तसेच कर्करोगाला साध न समजण्याची विनंती त्याने सर्वांना केली आहे. त्याला २००६ साली त्वचेचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे त्याला अनेक छोट्या शस्त्रक्रिया करून घ्याव्या लागल्या आहेत. तो त्यामुळे त्याबाबत जागरुकताही पसरवत असतो. २०२२ मध्येही त्याला त्याच्या कपाळावर शस्त्रक्रिया करावी लागली होती..क्लार्कने बुधवारी त्याच्या कर्करोगाबाबत अपडेट देताना लिहिले की 'त्वचेचा कर्करोग खरंच गंभीर आहे. विशेषत: ऑस्ट्रेलियामध्ये. मला आज पुन्हा एकदा माझ्या नाकावरून छोटा भाग काढून टाकावा लागला आहे. तुम्हाला एक मैत्रीपूर्ण आठवण करून देतो की तुमची त्वचा तपासून घ्या. प्रतिबंध हा नेहमीच उपचारापेक्षा चांगला असतो. माझ्याबाबतीत नियमित तपासणी आणि निदान महत्त्वाचे ठरले. डॉक्टर बिश सोलीमन यांचे आभार की त्यांनी हे लवकर ओळखले.'.क्लार्कच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याला काळजी घेण्यास सांगितले आहे. क्लार्क ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू राहिला असून त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने २०१५ साली पाचव्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. याशिवाय त्याच्याच नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला २०१३-१४ च्या ऍशेस मालिकेत ५-० असं पराभूत केलं होतं..Cancer Treatment: केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी मधील फरक काय? कोणत्या वेळी कोणाची निवड करावी ? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत.मायकल क्लार्कने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ११५ कसोटी सामन्यांमध्ये २८ शतकांसह ८६४३ धावा केल्या आहेत. तसेच त्याने २४५ वनडे सामन्यांत ८ शतकांसह ७९८१ धावा केल्या आहेत. ३४ टी२० सामन्यांत त्याने ४८८ धावा केल्या आहेत. त्याने गोलंदाजी करताना आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ९४ विकेट्स घेतल्या आहेत..FAQs१. मायकल क्लार्कला कोणता आजार झाला आहे?(What illness does Michael Clarke have?)➤ मायकल क्लार्कला त्वचेचा कर्करोग झाला आहे.२. मायकल क्लार्कला प्रथम कधी कर्करोगाचे निदान झाले?(When was Clarke first diagnosed with cancer?)➤ मायकल क्लार्कला २००६ साली कर्करोगाचे निदान झाले.३. अलीकडे मायकल क्लार्कवर कुठे शस्त्रक्रिया झाली?(Where did Clarke recently undergo surgery?)➤ मायकल क्लार्कच्या नाकावरील छोटा भाग काढून टाकण्यात आला.४. मायकल क्लार्कने चाहत्यांना कोणता संदेश दिला?(What message did Clarke give to fans?)➤ त्वचेची नियमित तपासणी करून घ्या आणि कर्करोगाला साधं समजू नका.५. मायकल क्लार्कने कर्णधार म्हणून कोणती मोठी विजेतेपदे मिळवली?(Which major titles did Clarke win as captain?)➤ २०१५ चा वर्ल्ड कप आणि २०१३-१४ ची ऍशेस मालिका.६. क्लार्कचा कसोटीतील रेकॉर्ड काय आहे?(What is Clarke’s Test record?)➤ ११५ कसोटी सामन्यांत २८ शतकांसह ८६४३ धावा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.